रेल्वेरुळालगत लगत पालेभाज्या उत्पादन करणाऱ्या लोकांचे आर्थिक व मानसिक जीवन

Barefoot Researchers’ Name
अंजली परशुराम रोडत आशीष अशोक शेडगे भक्ति देवदास गुरव ओमकार ज्ञानेश्वर साळवी प्रियांका रवींद्र जाधव

Methodology (number and type of methods)
मुलाखत ३० ( ३ स्त्रिया २७ पुरुष), फोटोग्राफी, मैपिंग

About the research (profile of researchers and why)
गटातील प्रत्येकाचे कुटुंब हे शेतीशी जोडले गेले होते त्याच बरोबर २००८ या वर्षी १९६६ , २०१३ या वर्षी १२९६ आणि २०१८ या वर्षी २७६१ शेतक-यानी आत्महत्या केली हि बातमी समोर आली. ‘शेतक-याच्या आत्महत्येची कारणे जाणून घेण्यासाठी गटाची तयारी झाली पण मुंबईत शेती नसल्याने हि कारणे जाणून घेणे कठीण झाले. तेव्हा गटातल्या काही सदस्यांच्या लक्षात आले कि मुंबईत रेल्वे रुळालगत शेती करणाऱ्या लोकांचा समूह रहातो आणि मग गटाने ” रेल्वे रुळालगत भाजीपाला उत्पादन करणाऱ्या लोकांचे सामजिक आणि आर्थिक जीवन अभ्यासणे ” हा विषय निवडला

Findings
१) भाजीपाला उत्पादन करणारे बहुंताश लोक हे उत्तरप्रदेश या राज्यातून आलेली आहेत. २) जास्त शेतकरी हे एस.सी, एस.टी, ओ.बी.सी, या जातीचे आणि ४१ ते ७० या वयोगटातले होते. ३) बेरोजगारी, मजबुरी तसेच अशक्त बाजार पेठ आणि मुंबईतील अधिक उत्पन्न मिळवून देणारी बाजार पेठ स्थलांतरचे मुख्य कारण आहे. ४) या शेती मध्ये फक्त पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते आणि त्यांना लागणारे अवजारे, बी-बियाणे हि कल्याण पाठरे नर्सरी तसेच भायखळा, कांदिवली येथून आणली जातात. ५) जमीन हि रेल्वेच्या मालकीची आहे आणि कसण्यासाठी देण्यात आलेल्या जमिनीचा कालावधी अनिश्चित आहे तसेच जमिनीचे भाडे तसेच भाडे भरण्याचे ठिकाण निश्चित नाही. ६) जास्तीत जास्त ठिकाणी “जिथे नाला तिथे शेती” आढळून आले. ७) भाजीपाला उत्पादन करणाऱ्या ह्या समाजाला रेल्वेकडून जमिनी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या मुलभूत सुविधा मिळत नाही

Action and advocacy
PPT आणि Chart पेपर च्या माध्यमातून Advocacy मानखुर्द, ठाकुर्ली, विलेपार्ला, सानपाडा या ठिकाणी करण्यात आली.

Recommendations
१) उत्पादन करणा-या करीता जमिनी रूप भाडे निश्चित करावे आणि ते भरण्यासाठी निश्चित ठिकाणाची निर्मिती करावी. २) भाजीपाला उत्पादन करणाऱ्या समाजाला वीज, पाणी आणि शौचालय या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे. ३) शेतीसाठी लागणारे पाणी हे नाल्यातून न घेता योग्य ते पाणी उपलब्ध करून देणे. ४) उत्पादन देत असलेल्या जागेपासून ते रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी कुठली हि पायवाट नसल्यामुळे त्याना सुरक्षित पायवाट उपलब्ध करून देणे.

Limitations

  • मुंबईत रेल्वे रुळालगत शेती करणारे लोक – मुंबईशी जोडले गलेली रेल्वे लाईन

Locality
चर्चगेट ते विरार, CST ते बदलापूर, वडाळा ते पनवेल.

Keywords (4+)
शेती, रेल्वे प्रशासन