कर्जत विभाग कातकरी समाजातील मुलींचे बालविवाह

Barefoot Researchers’ Name
सपना पाशिलकर खंडू मंजुळे माधुरीदेवी कुमार प्रवीण खंडवी दर्शना शेट्ये अंजली देशमुख

Methodology (number and type of methods)
मुलाखात ४८ (२० विवाहित महिला, १८ अविवाहित मुली, ४ अंगणवाडी सेविका, ३ पालक, १ सरपंच, २ संस्था प्रतिनिधी आणि आशावर्कर) ५ गावांमधून ८७ घराचे सर्वेक्षण

About the research (profile of researchers and why)
कर्जत या विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी आदिवासी हि जमात प्रामुख्याने दिसून येते यात महादेव कोळी, ठाकूर आणि कातकरी या जमातीचा समावेश आहे. कातकरी समाज येथे सर्वात जास्त प्रमाणात दिसून येतो. महादेव कोळी, ठाकूर या जमाती पेक्षा कातकरी समाज जास्त मागासलेला दिसून आला. बहुतांश या लोकांना ६ ते ८ महिने रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. अशावेळी शाळेत जाणारी मुले देखील पालकांसोबत स्थलांतर होतात. ज्या मुली वयात आल्या म्हणजे मासिक पाळी सुरु झाली कि त्यांना सोबत घेऊन जाणे जिकरीचे होऊन जाते त्यामुळे मुलींच्या मतांना महत्व न देता त्यांची लग्न करून दिली जातात. २१ व्या शतकात हि मुलींचे लग्न १८ वर्षाच्या अगोदर झाल्यास मुलींवर आणि कुटुंबावर त्याचा काय परिणाम होतो आणि ते थांबविण्यासाठी कोणत्या प्रकारची उपाय योजना करू शकतो हे जाणून घेणे गरजेचे वाटले त्यामुळे हा विषय निवडण्यात आला.

Findings
१) मुलगी वयात आली म्हणजे तिला मासिक पाळी सुरु झाली कि तिचे लग्न करून दिले जाते. २)कातकरी समाजातल्या बऱ्याच मुलींचे लग्न १३ ते १५ या वयात झाले आहे. ३)कुटुंबाचे होणारे हंगामी स्थलांतर, प्रवासाच्या समस्या, आर्थिक परिस्थिती, कुटुंबाची जबाबदारी इत्यादी कारणामुळे मुलींचे पुढचे शिक्षण होत नाही कारण गावात ८वी इयत्ते पर्यंत शाळा आहे. ४) कमी वयात लग्न झाल्यामुळे गरोदर पणात त्या मुलीचे किंवा बाळाचे मृत्यू झाले आहे तर काही बाळ अशक्त आणि कुपोषित जन्माला आले आहेत. ५) लिव्ह इन रिलेशनशिप ला कातकरी समाजात विरोध केला जात नाही. ६) लहान वयात गरोदर राहिल्यामुळे मुली डॉक्टर कडे जात नाही कारण कमी वयात लग्न केले आणि गरोदर राहिल्यामुळे डॉक्टर त्या मुलीना ओरडतात.

Action and adovcacy
वेनगाव कातकरवाडी (गावकरी, पालक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सरपंच, GP सदस्य, गावतील डॉक्टर एकूण ६० लोकांसोबत) मुगपे कातकरवाडी (गावकरी, पालक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, GP सदस्य एकूण ३० लोकांन सोबत) तामनाथ कातकरवाडी (गावकरी, पालक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, GP सदस्य एकूण ४५ लोकांन सोबत)

Recommendations
१) सामाजिक संस्था, सरपंच, अंगणवाडी सेविका, तसेच गावातील प्रभावशाली व्यक्ती यांची मदत घेऊन कार्यक्रम राबविणे आणि कातकरी समाजात शिक्षणा संदर्भात जनजागृती करणे. २) किशोरवयीन मुली आणि विवाहित महिला यांना बालविवाह केल्याने स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात हे समजून सांगणे. ३)ज्या मुली शिकत नाहीत किंवा विवाहित मुलींसाठी व्यवसाय प्रशिक्षण, विविध कोर्स यांची माहिती देणे. ४)शिक्षण घेत असलेल्या मुली ज्यांना पुढे शिकण्याची इच्छा आहे त्यांना सामाजिक संस्थेशी संपर्क घालून देणे. ५) गावातल्या सरपंच यांचाशी बोलून महिलांसाठी गृहउद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करणे.

Limitations

  • कर्जत येथील आदिवासी पाडे आणि गाव. – कातकरी समाज. – १८ वर्ष अगोदर लग्न केलेल्या विवाहित महिला. – गावातले आदिवासी समाजातले रहिवाशी

Locality

चर्चगेट ते विरार, CST ते बदलापूर, वडाळा ते पनवेल.
सेन्ट्रल, हार्बर,वेस्टर्न रेल्वे लाईन
दादर – नायगाव
कर्जत मधील ५ गावे वेनगाव, लाडीवली, तमनाथ, मुगपे आणि पळसदरी

Keywords (4+)
कातकरी समाज (आदिवासी), शिक्षण, बालविवाह,

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *